भारतातील मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक असलेल्या भारतीय हळदीला जगभरातून वरचेवर चांगली मागणी वाढत आहे. यंदा भारतातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हळदीला सध्या जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून जागतिक पातळीवर हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे हळदीचे महत्व वरचेवर वाढत आहे. त्यामुळे हळद निर्यातीचे आकडेही वाढत आहेत.
ब्रेकिंग न्यूज : असे असेल संभाव्य खाते वाटप ? कृषी खाते पुन्हा दादा भूसे यांच्याकडे
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र 1,25,800 हेक्टर असून उत्पादन 5,50,185 मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80 % उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी 15 ते 20 % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली 8,500 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42,500 मेट्रिक टन इतके होते.
कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आले आहेत. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. तर यंदा जुलै अखेर 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली आहे. त्यामुळे यंदा वर्ष अखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज सांगलीच्या कसबे-डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : पावसामुळे भाज्या महागल्या
हळदीची यंदा दोन लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळं हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे. भारतातून गेल्या तीन वर्षांपासून हळदीच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. करोना काळात हळदीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग अनेक राष्ट्रांमध्ये नव्याने होऊ लागला. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.
जगभरात होत असलेला आयुर्वेदाचा प्रसार आणि करोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. 2018-19 मध्ये 1 लाख 33 हजार 600 टन इतकी हळद निर्यात झाली होती. सन 2019-20 हळदीची निर्यात 4 हजार 50 टनांनी वाढून 1 लाख 37 हजार 650 टनापर्यंत पोहोचली होती. 2020 मध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. हळूहळू प्रादुर्भाव वाढू लागला. परिणामी निर्यात काही प्रमाणात बंद होती. त्यामुळं निर्यात घटेल असा अंदाज होता. मात्र, याच काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात हळदीचा वापर वाढला आहे. सन 2020-21 मध्ये हळदीची 1 लाख 83 हजार 868 टन निर्यात झाली. अर्थात 46 हजार 218 टनाने वाढली आहे.
मान्सून अपडेट : सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट
जगभरातून देशातील हळदीला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून हळदीची निर्यात सतत वाढत आहे. सध्या देशातून 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली आहे. ही निर्यात दोन लाख टनांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे. जगामध्ये भारत देश हळद उत्पादनात अव्वल आहे. हळदीचे एकूण 80 टक्के उत्पादन भारतातच होते. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामीळनाडूमध्ये सर्वाधिक हळद होते.
भारतातील हळदीचा दर्जा चांगला असल्याने, अमेरिका, इंग्लडसह अरब देशांतून हळदीला चांगली मागणी आहे. कोरोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढत चालला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो हळद गरम पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. अशा या हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे हळदीचे महत्व वाढत आहे.
हे नक्की वाचा : यंदा 92 लाख शेतकऱ्यांचा भरला पीकविमा
गेल्या चार वर्षात हळदीच्या निर्यातीत वरचेवर वाढ होत असून, 2018-19 मध्ये 1,33,600 टन हळदीची निर्यात व 1,41,616 लाखांची उलाढाल झाली होती. 2019-20 मध्ये 1,37,650 टन हळदीची निर्यात झाली होती. त्यातून 1,28,690 लाखांची उलाढाल झाली. 2020-21 मध्ये 1,83,868 टन हळदीची निर्यात झाली. त्यातून 1,72,264 लाखांची उलाढाल झाली. तर 2021-22 मध्ये 1,53,154 टन हळदीची निर्यात झाली आणि त्यातून 1,78,433 लाखांची उलाढाल झाली आहे.
महत्त्वाची घोषणा : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1